आडसच्या नवविवाहित लेकीचा परळीत हुंडाबळी; चौघावर गुन्हा, पतीस अटक.

परळी दि.22 जून – परळी येथील वटसावित्रीनगर भागात नऊ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह याच भागातील एका विहीरीत सोमवारी रात्री आढळून आला. विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वडिलांच्या तक्रारी नंतर तिच्या सासरकडील चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात (Police Station) मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान विवाहीतेच्या पतीस शहर पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली आहे.
(The dowry sacrifice of the newlywed daughter of Adas; Four arrested, husbund arrested.)
कोमल सोमनाथ पडुळकर (वय 19) असे विवाहितेचे नाव आहे. सदरील विवाहिता दि.19 जून पासून बेपत्ता होती. दरम्यान, या मयत महिलेचे शवविच्छेदन दि.22 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास येथील उपजिल्हा रुग्णालयात झाले. सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत आडस ता. केज येथील नातेवाईकांनी सायंकाळी 6 पर्यंत मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता व शहर पोलीस ठाण्यात (Police Station) ठिय्या केला.
याबाबत पोलिस (Police) सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील वटसावित्रीनगर या भागातील कोमल सोमनाथ पडुळकर ही महिला दि.19 रोजी घरातून बेपत्ता असल्याची नोंद शहर पोलीसांकडे करण्यात आली होती. दि.19 रोजी ही महिला पहाटे 6 च्या सुमारास घराबाहेर पडली होती. ती परत आलीच नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली पण शोध लागला नाही. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली.
मयत विवाहितेचा नऊ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. दरम्यान वटसावित्रीनगर भागातील एका विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला. प्रथमदर्शनी सदरील विवाहितेने जाचास कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, जमादार गोविंद बडे, तुकाराम मुरकुटे, नवनाथ हरगावकर यांनी दि.21 रोजी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी विवाहितेचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला.
घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांनी परळी पोलीस ठाण्यास भेट दिली. संशयीत आरोपी म्हणून मयत महिलेच्या पतीला अटक केली. या प्रकरणी संजय रघुनाथ पवार रा. आडस यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी विवाहितेचा पती सोमनाथ बालासाहेब पडूळकर, सासरा बालासाहेब पडूळकर, सासू मंगल पडूळकर, नंनद उषा मच्छिंद्र चव्हाण या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला आहे.
विवाहितेचा पती सोमनाथ पडूळकर यास पोलिसांनी ताब्यात (arrested) घेतले आहे. माहेरून राहिलेले हुंड्याचे वीस हजार रुपये व मोटरसायकल घेण्यासाठी तीस हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरकडील मंडळींनी कोमलला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.