आता चारचाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ बंधनकारक

दिल्लीः दि.८-केंद्र सरकारकडून आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात काल एक परिपत्रक काढले असून यात १ जानेवारी पासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ Fast Tag अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे  १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर विक्री झालेल्या वाहनांसह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील हा नियम लागू असणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार ‘फास्ट टॅग’ ला १ डिसेंबर २०१७ नंतर खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांच्या सर्व रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य केले गेले होते. यापूर्वी वाहन निर्माता किंवा डीलरद्वारे ‘फास्ट टॅग’चा पुरवठा केला जात होता. फिटनेस प्रमाणपत्राचे रिन्युअल केवळ ट्रान्सपोर्ट वाहनांवर ‘फास्ट टॅग’ Fast Tag लावल्यानंतरच केले जात असे. नॅशनल परमीट वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ Fast Tag लावणे १ ऑक्टोबर २०१९ पासून बंधनकारक करण्यात होते. सुचनांनूसार थर्ड पार्टी इंश्युरन्स घेताना देखील मान्यताप्राप्त ‘फास्ट टॅग’ बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकेटच्या पाहणीवरून होईल, जिथे ‘फास्ट टॅग’ Fast Tag चा आयडी डिटेल्स पाहिल्या जाईल. हा निर्णय १ एप्रिल २०२१ पासून लागू होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!