माझं गाव

अवघ्या चार दिवसात पिता पुत्राचे कोरोनामुळे निधन ; धारुर तालुक्यातील दुर्दैवी घटना.

किल्लेधारूर दि.15 मे – धारुर (Dharur) तालुक्यातील हिंगणी बुद्रुकचे माजी उपसरपंच शेख रज्जाक (45) यांचा कोरोनावर उपचार सुरु असताना आज दि.15 शनिवारी पहाटे निधन झाले. चार दिवसांपुर्वीच कोरोनामुळे त्यांच्या वडिलांचे निधन (Corona Death) झाले. सर्वत्र ईद साजरी होत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

(Father and son die of corona in just four days; Unfortunately incident in Dharur taluka.)

दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे खंदे समर्थक म्हणून धारुर तालुक्यात शेख रज्जाक यांची ओळख होती. मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्वतः ग्रामपंचायत ताब्यात घेऊन सरपंच उपसरपंच दोन्ही पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी त्यांनी काम केले. माजी मंत्री पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांच्या जवळच्या परिचित कार्यकर्त्यात त्यांचा समावेश होता.

रज्जाक यांचे वडिल शेख मदार (70) यांचे कोरोनावर उपचार सुरु असताना चार दिवसांपुर्वीच निधन झाले. तर लातूर येथील खाजगी रुग्णालयात रज्जाक शेख यांच्यावर उपचार चालू होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज दि.15 शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वडिलां पाठोपाठ चार दिवसांनी रज्जाक यांचीही कोरोनामध्येच प्राणज्योत (Corona Death) मावळली. यामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सर्वत्र पवित्र रमजान व ईद साजरी होत असताना शेख कुटूंबावर काळाने घाला घातला. वडिलां पाठोपाठ एकुलता एक मुलगा असलेला चळवळीतला कार्यकर्ता कोरोनाने हिरावला. यामुळे हिंगणीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रज्जाक यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली एक मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!