बाळाच्या जन्माअगोदरच हरवले पित्याचे छत्र..! पत्नीच्या प्रसूतीसाठी निघालेल्या पित्याचे अपघाती निधन.

नांदेड दि.5 जून – पत्नीच्या प्रसूतीदरम्यान दवाखान्यात भेटण्यासाठी निघालेल्या पतीचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना अर्धापूर तालुक्यात घडली. चिमुकलीच्या जन्माच्या पाच तास अगोदर पित्याचे छत्र हरवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अर्धापूर (Nanded) तालुक्यातील मालेगाव ( जंगमवाडी ) येथील सुजित प्रेमाजी सूर्यवंशी यांचा विवाह बारड येथील योगिताशी एक वर्षापूर्वी झाला. सुखी संसाराची स्वप्ने गिरवीत असतांना दोघांत तिसरे बाळ येणार होते. पत्नी योगिता ही माहेर असलेल्या बारड येथे गेली होती. पत्नीस प्रसूतीसाठी डोंगरगाव येथील दवाखान्यात दाखल केले असता सुजित सुर्यवंशी यास सासरे प्रल्हाद गायकवाड यांचा फोन आला व सुजित मालेगाव येथुन डोंगरगाव येथे निघाला.
दि.3 जुनच्या रात्री व दि.4 जुन रोजी सकाळी 1 च्या सुमारास मालेगाव ते बारड रस्त्याने मोटारसायकल ने जात असतांना मेंढला शिवारातील महादेव मंदिराजवळ सुजित प्रेमाजी सूर्यवंशी (वय 26) वर्षे यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सुजित च्या तोंडास व डोक्याला जब्बर मार लागला होता. सदर घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी (Police) जखमीस तात्काळ शासकीय रूग्णालय अर्धापूर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
अपघातानंतर (Accident) पाच तासांनी मयताच्या पत्नीस कन्यारत्न झाले. एकीकडे बापाचा मृत्यू तर दुसरीकडे मुलीचा जन्म अशा या योगायोगाने अनेकांच्या डोळ्यात अश्रु दिसत होते. बापाच्या दुर्दैवी अपघातामुळे (Accidental death) अर्धापूर तालुक्यातील मालेगाव ( जंगमवाडी ) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
( Father’s umbrella lost before the baby is born ..! Accidental death of father who left for wife’s delivery. )