भय इथले संपत नाही… बिबट्याच्या वावराने जनता भयभीत… शेतात आढळले पायाचे ठसे

बीड दि.२७ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात अहमदनगर सिमाभागात व आष्टी तालुक्यात सध्या बाबट्याचे वावर असून या भागातील जनता सध्या भितीच्या सावटाखाली आहे. दोन दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेनंतर नरभक्षक बिबट्याला Leopard पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने सुरडी वन परिसरात पिंजरा लावण्यात आलेला आहे. तालुक्यात काही भागात बिबट्या Leopard आढळल्याचे व पायाचे ठसे सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
आष्टी शहराजवळच असलेल्या वारंगूळे वस्ती येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे यांच्या भगवान महाविद्यालय शेजारील शेतात गुरुवार दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी बन्सोडे हे पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना संशयित बिबट्याचे पाऊलांचे ठसे आढळून आले. दरम्यान वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता दोन बिबटे Leopard या भागातून गेल्याचे ठसे असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच त्याच भागात जवळच आलेल्या पारधी वस्तीवर गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास तेथील लोकांनी बिबट्या पाहून आरडाओरड केल्याचीही माहिती मिळाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे खोळंबली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे व बिबट्या Leopard आढळल्यास तात्काळ वनविभाग किंवा प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.