भय इथले संपत नाही ….कोरोनाचा कहर सुरूच! अंबाजोगाईत 24 मृतदेहांवर अंत्यसंस्कार.

अंबाजोगाई दि.18 एप्रिल – अनेकांना पटणार नाही पण ही सत्य परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव अधिक आहे. वाढत्या रुग्णसंख्ये सोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत (Corona Death) झालेल्या 24 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

(Fear doesn’t end here …. Corona’s havoc continues! Funeral on 24 bodies at Ambajogai.)

गतवर्षी कोरोनाचे थैमान सुरु झाल्यानंतर थेट चीनवरुन विदारक चित्र संपुर्ण जगात सोशल माध्यमातून व्हायरल होत असत. गतवर्षी संपुर्ण जग दहशतीखाली होतं. भारतात लॉकडाऊन लावल्यानंतर अख्खा देश ठप्प झालेलं होतं. पहिल्या लाटेत देशात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाची लाट नोव्हेंबर 2020 मध्ये थंड पडत असल्याचे दिसुन आले. हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असताना मार्च 2021 मध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं. महाराष्ट्रात याचा प्रादुर्भाव अधिक दिसुन येत आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्यात. यंदा मात्र आपल्या अवतीभवती हे विदारक चित्र दिसत असताना लोकांचा प्रशासनाने लादलेल्या उपाययोजनांना हडताल फासलेला दिसत आहे.

दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यातही दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर जिल्ह्यात विक्रमी 1211 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झालं. यातील एकट्या अंबाजोगाई तालुक्यात 337 कोरोना बाधित (Corona Positive) आढळून आली आहेत. सध्या अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय (SRTR)आणि लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची (Corona Death) आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. गेल्या आठवड्यात अंबाजोगाई शहरात एकाच सरणावर आठ जणांना अंत्यसंस्कार झाल्याचे दिसले. असेच चित्र गेल्या दोन दिवसातही पहायला मिळाले. शुक्रवारी आणि शनिवार प्रत्येकी 12 असे दोनच दिवसात एकूण 24 मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेजारच्या सर्व तालुक्यातून गंभीर रुग्ण अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय (SRTR) आणि लोखंडीचे कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) दाखल होत आहेत. हि दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!