अखेर बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निघाले….
मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक यांचे आदेश

बीड: दि.७- बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) तालुक्यातील सुरुडी , किन्ही , मंगरुळ , पारगाव जो., पाटोदा तालुक्यातील मौजे जाटवड व सोलापुर वनविभागातील मोहोळ वनपरिक्षेत्रातील मौजे लिंबेवाडी ता . करमाळा या परिसरात धुमाकुळ घालणाऱ्या व मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या बिबटयाला (Leopard) पिंजऱ्यात कैद करण्यास अपयश आल्याने ठार मारण्याची परवानगीचा आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितिन काकोडकर यांनी दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी (Ashti) व पाटोदा तालुक्यात बिबट्याची दहशत आहे. या नरभक्षक बिबट्याने (Leopard) आष्टी तालुक्यात तीन बळी घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धूमाकूळ घातला आहे. करमाळा तालुक्यातही दोन बळी घेत दहशत पसरवली आहे. या बिबट्यास ठार करण्याची मागणी नागरीकांतून होत होती. आ. बाळासाहेब आजबे व आ. सुरेश धस यांनी वन मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक नितिन काकोडकर यांनी विविध मार्गदर्शक सुचना देत सदरील बिबट्यास (Leopard) जेरबंद करणे शक्य न झाल्यास दि.३१ जानेवारी २०२१ पर्यंत ठार करण्याची परवानगी आदेश दिला आहे. यामुळे आता वन विभागाने (Forest Department) नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बिबट्यास मानवीहानी टाळण्यासाठी ठार करणे सोपे होणार आहे. यापुर्वी वन विभागाने (Forest Department) आठ पिंजरे लावून तज्ञ पथका मार्फत बिबट्यास कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही वनविभागाला यात यश आलेले नाही.