अखेर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले… जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी हे बंद ….

बीड दि.13 मार्च- बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Collector Ravindra Jagtap) यांनी निर्बंध वाढविले आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, पान टपरी, चहाचे हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट पूर्णतः बंद ठेवण्याचे (पार्सल सेवा सुरु) आदेशात म्हटले आहे. दि. 18 मार्च पासून अनिश्चित काळासाठी मंगल कार्यालय, फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम बंद राहतिल. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी शनिवार दि.13 रोजी दिले आहेत.

(Finally, the Beed District Collector issued an order … It is closed indefinitely in the district ….)

मराठवाड्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा वाढत चालला आहे. तसतसे विविध जिल्ह्यात निर्बंध लावली जात आहेत. औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद व जालन्यात निर्बंध वाढवण्यात आली आहेत. बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष करून बीड (Beed) शहरात दररोज कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप (Collector Ravindra Jagtap) यांनी दि.13 शनिवारी नवीन आदेशाद्वारे जिल्ह्यातील निर्बंध वाढविले आहेत.

बीड शहर व जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील तील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पार्सल सुविधेला मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, दूध, औषधालय व अन्य जीवनावश्यक आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना सायंकाळी सात वाजेनंतर सकाळी सातपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व दुकानदारांनी आपल्या कामगारांची दर पंधरा दिवसांना कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल जवळ ठेवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारीही घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा व जीम पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंगल कार्यालय, फंक्शन हॉल दि.18 मार्च पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्‍यास आयोजकासह मंगल कार्यालय मालकावर दंडात्‍मक कारवाई केली जाणार आहे. दरम्‍यान, धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम फेरी, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे आदींना अनिश्चित काळासाठी मनाई आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!