अखेर बहूचर्चित बीड जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर…

बीड दि.१२ (प्रतिनिधी)- बहूचर्चित बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (DCC Beed election) निवडणूकीचा कार्यक्रम अखेर आज जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी २० मार्च रोजी मतदान होणार असून सोमवार (दि. १५ ) पासुन उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Beed election) विद्यमान संचालक मंडळाची मुदत यापुर्वीच संपली आहे. मात्र कोरोनामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूका लांबल्या होत्या. त्यानंतर सध्याच्या मतदार यादीवर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निवडणूक लांबली होती. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूकीचा मार्ग मोकळा होवून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सोमवार (दि. १५) पासून ते २२ फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करता येणार तर अर्जांची छानणी २३ फेब्रुवारीला होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २४ तारखेपासून १० मार्चपर्यंत असणार आहे. १९ जागांसाठी २० मार्चला मतदान होणार असून २१ रोजी मतमोजणी होणार आहे.