घाटात जीप उलटून पाच ठार…. १४ गंभीर जखमींची स्थिती चिंताजनक…

रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या मजूरांवर कोसळले संकट

नंदूरबारः नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील तोरणमाळ खडकी घाटात (Ghat) शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जीप दरीत कोळल्याने भीषण अपघात (Accident) झाला. अपघातग्रस्त जीपचा चुराडा होवून या अपघातात ५ मजूरांचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जवळजवळ १५० फूट खोल दरीत जीप कोसळली. गंभीर जखमी असणाऱ्यांची संख्या जास्त असून मृतांचा आकडे वाढू शकतो. मृतांमध्ये एका मुलीचा आणि तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा पर्वतांच्या दुर्गम भागातील खडकी गावातून एका जीपमधून सुमारे ३० आदिवासी मजूर प्रवास करत होते. रोजगाराच्या शोधात हे मजूर मजुरीसाठी गुजरातमध्ये जात होते. खडकी गावाजवळ तोरणमाळचा घाट (Ghat) चढताना जीप अचानक दरीत कोसळली. स्थानिकांनी आणि पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तसेच घाट चढत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात (Accident) झाल्याची शक्यता पोलिसांकडून (Police) वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!