या कारणाने धनंजय मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती.

मुंबई दि.13 एप्रिल – राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. आज दि.13 बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका नव्हता तर इतर कारणामुळे त्यांना भोवळ आली असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

मंगळवारी मुंडे यांना छातीत थोडा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) रात्री रुग्णालयात पोहोचले होते. 46 वर्षांचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर उपचार सुरू असून टोपे यांनी डॉक्टरांची भेट घेऊन नंतर पत्रकारांना मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंडे यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे एमआरआय (MRI) केले आहे. परिस्थिती नियंत्रित असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

धनंजय मुंडे यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त माध्यमातून समोर आले. यानंतर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांत चिंता व्यक्त केली जात होती. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा जनता दरबार मुंबई कार्यालयात होता. यात अधिक धावपळ व दगदग झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना भोवळ येवून ते बेशुद्ध अवस्थेत गेले होते.

आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँन्डी रुग्णालयात धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा कसलाही धक्का आलेला नव्हता असे स्पष्ट केले. कामाच्या ताणातून त्यांना भोवळ आल्यासारखे झाल्याची माहिती दिली. पत्रकारांनी यावेळी राज ठाकरे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला पवार यांनी बगल देत त्यांना जास्त महत्त्व देवू नका असा टोला लगावला.

( For this reason Dhananjay Munde was admitted to Breach Candy Hospital; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!