सत्यनारायण पुजेनंतर नवरदेवाची आत्महत्या; दुर्दैवी घटनेने माजलगाव तालुक्यात हळहळ.

माजलगाव दि.23 नोव्हेंबर – माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील युवकाचे शनिवारी मंगल कार्यालयामध्ये थाटामाटात लग्न झाले. सोमवारी सत्यनारायण पुजा झाल्यानंतर सदरील युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेने माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

(Navradeva commits suicide after Satyanarayana Puja; The unfortunate incident caused a stir in Majalgaon taluka.)

माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) या युवकाचा विवाह माजलगाव येथील मुलीशी झाला होता. शनिवारी येथील मंगल कार्यालयामध्ये रेशीम गाठी बांधल्या गेल्या. सोमवारी (दि.22) या लग्नानिमित्त सत्यनारायण महापूजा करण्यात आली. परंतु पुजा संपताच नवरदेवाने शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नित्रुड येथे घडली आहे.

तालुक्यातील (Majalgaon) नित्रुड येथे पांडुरंग रामकिसन डाके (वय 26) हा युवक शेती व किराणा दुकानाचा व्यवसाय करतो. शनिवारी (दि.20) माजलगाव येथील मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न झाले. यानंतर आज सोमवारी वधू-वरांकरीता सत्यनारायण महापूजाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नातेवाईकांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले.

सत्यनारायण पूजा आटोपल्यानंतर नवरदेवाने जेवण केले आणि पाय दुखत असल्याचे सांगत शेतात जाऊन येतो म्हणत त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील शेतकऱ्याने सदरील धक्कादायक घटना डाके कुटूंबीयांना सांगितली. यानंतर एकच खळबळ उडाली.

यानंतर पोलिसांनी (Police) पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रूग्णालयात पाठविला असुन आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही. दरम्यान हळद अंगावरील फिटण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नवरदेवाने अचानक टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!