धक्कादायक … दारुच्या नशेत मुलाकडून आईची हत्या; पाठलाग करुन पोलिसांनी मुलाला घेतले ताब्यात.

बीड दि.21 अॉगस्ट – रात्री दारूच्या नशेत आईला केलेल्या मारहाणीत तिचा जीव गेल्याचे लक्षात येताच मारेकरी मुलाने पळ काढला. मात्र पळून चाललेल्या मुलास दीड तासाचा पाठलाग करीत शहागड जवळ ताब्यात घेण्यात नेकनूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) लक्ष्मण केंद्रे यांना यश आले.
(Shocking … Murder of a mother by a drunken child; Police chased and took the boy into custody.)
चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय 70) महिलेचा मुलाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची खबर सकाळी नेकनुर पोलिसांना (Police) मिळाल्यानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी सूत्रे हलवत पीएसआय (PSI) विलास जाधव यांना घटनास्थळी रवाना करून स्वतः पळून चाललेल्या मुलाच्या दिशेने पाठलाग केला.
बीड, गेवराई मार्गे महाकाळ येथे सासुरवाडीकडे संशयित आरोपी मदन पांडुरंग मानगिरे (वय 28) पळून जात असल्याची खबर असल्याने विलंब न करता स्वतः च्या खाजगी वाहनाने त्याचा पाठलाग करत शहागडच्या जवळ त्याला दुचाकी वरून ताब्यात घेतले. आरोपी सोबत लहान मुलगा होता त्यांना नेकनूर पोलिस स्टेशनला (Police station) आणण्यात आले आहे.
मृत महिला दारू पित असल्याचे बोलले जात असून याला विरोध करीत मुलाने मारहाण केल्याची चर्चा आहे. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या माराने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा (murder) गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे यावेळी पोलिसांनी स्पष्ट केले.