माजी आ.आर.टी. देशमुख व खा.डॉ.प्रीतम मुंडे यांच्या फंडातील ४१ कामे बोगस….
आ.सोळंके यांच्या मागणीमुळे चौकशीचे आदेश....

माजलगाव दि.७(प्रतिनिधी)- माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख (R.T. Deshmukh) आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या फंडातून करण्यात आलेल्या ४१ कामाची चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत. आ.प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आमदार व खासदार फंडातून बोगस कामे झाल्याच्या तक्रारी येत असल्याने चौकशीची मागणी केली होती.
तत्कालीन आमदार आर. टी. देशमुख (R.T. Deshmukh) यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून आपल्या यंत्रणेमार्फत २०१६ -१७ ते २०१९-२० या कालावधीत ऐकून ४५ कामे करण्यात आली असून सदरील कामे बोगस कागद पत्राच्या आधारे बिल उचलून भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी तक्रारीत नमूद ४५ कामापैकी आमदार निधीतून ३९ कामे व खासदार निधीतून २ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या. तर चार कामाला मान्यता देण्यात आलेली नव्हती. त्यावर आ.प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी तक्रार केली होती. सदरील कामात भौतिकदृष्टया पूर्ण झालेली आहेत किंवा नाही याबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी अहवाल दि.२० डिसेंबर २०२० पूर्वी जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात यावा असे कळविण्यात आले होते. सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार सदरील कामात तफावत आढळल्याने सदरील कामाची चौकशी करण्यात येत आहे. तसे आदेश जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन संयोजन समिती यांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना देऊ केले आहेत.