बीड जिल्ह्यात माजी आमदाराची गाडी पलटी; कट्टर विरोधकाची मदत आणि जखमी अवस्थेत लग्नात उपस्थिती.

केज दि.5 फेब्रुवारी – केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला केजजवळ दुपारी अपघात झाला. गाडीचा अपघात (Accident) होवून जखमी अवस्थेतही माजी आमदार साठे नियोजित लग्न समारंभास उपस्थिती दाखवली.

(Former MLA’s vehicle overturned in Beed district; Helping a staunch opponent and attending a wedding in an injured state.)

माजी आमदार (Former MLA) साठे हे केज बीड (Kaij Beed) रोडने जात असताना तालुक्यातील टाकळी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली असून गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही. सदर घटना शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास घडली.

कट्टर विरोधकाने केली मदत
दरम्यान अपघात झाला त्याचवेळी युवानेते अक्षय मुंदडा (Akshay Mundada) हे बीडकडून आले होते. सदर घटना त्यांनी पाहताच त्यांनी थांबून गाडीतील माजी आमदार साठे यांना व इतर दोघांना बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात पाठवून दिले. मुंदडा हे साठे यांचे कट्टर विरोधक आहेत. मुंदडा यांच्या पत्नी आ.नमिता यांनी साठे यांचा विधानसभा निवडणूकीत पराभव केला आहे.

जखमी अवस्थेत मा. आ.साठेंची शुभविवाह प्रसंगी उपस्थिती
केज जवळील बीड रोडवरील टाकळी फाटा येथील घुंबरे यांच्या एच.पी.या पेट्रोल पंपावर एका दुचाकी स्वारास वाचवण्यासाठी माजी आ. पृथ्वीराज उर्फ रोमन साठे (Pruthviraj Sathe) यांची इनेव्हा गाडी पल्टी झाली. यामध्ये आ.साठे हे जखमी झाले असताना देखील ते मस्साजोग येथील एका शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहीले व शुभविवाह झाल्यानंतर मस्साजोग येथून आ.साठे उपचारासाठी अंबाजोगाईकडे मार्गस्थ झाले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!