माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांची या पदावर वर्णी; जयंत पाटील यांची घोषणा.

मुंबई दि.27 मे – माजी केंद्रीय मंंत्री (Former Union Minister) जयसिंगराव गायकवाड पाटील यांचा संघटनात्मक पक्ष बांधणीचा अनूभव पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मराठवाडा संपर्क प्रमूखपदी नियूक्तीची घोषणा केली.
(Former Union Minister Jaysingrao Gaikwad’s role in this post; Announcement by Jayant Patil.)
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठवाडा विभागाचे ‘संपर्क प्रमुख’ म्हणून जयसिंगराव गायकवाड पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांना पक्ष संघटनेचा प्रदीर्घ काळ अनुभव आहे.
त्यांचा अनुभव मराठवाडा विभागात पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला आहे. तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून संघटना अधिक मजबुत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना ना. जयंत पाटील यांनी जयसिंगराव गायकवाड पाटील यांना केल्या आहेत.
जयसिंगराव गायकवाड पाटील (Jaysingrao Gaikwad) यांची नियूक्ती संपर्क प्रमूख म्हणून झाल्याने अनूभवी व संघटन कौशल्य असणारे व्यक्ती मिळाल्याने कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भवन मुंबई येथे नियुक्ती पत्र देत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
जयसिंगराव गायकवाड यांचा राजकीय प्रवास
जनसंघापासून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत गायकवाड यांनी भाजपात अनेक पदे भुषवली आहेत. राजकीय कारकिर्दीत संघटनात्मक काम करत त्यांनी सर्वप्रथम औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला.
यानंतर राज्यात युती शासनात महसुल व सहकार राज्यमंत्री ते बीडचे खासदार होत वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय खणिकर्म राज्यमंत्री असा राजकीय प्रवास केला. भाजपात नाराजीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन दोन वेळा बीडचे खासदार म्हणून लोकनियुक्त झाले.
तत्पुर्वी त्यांनी भाजपाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रतिनिधित्व केले. जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी नुकतेच औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज त्यांना मराठवाडा विभागाची संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली.