“दुर्ग बांधणी” कलाकारांचा पारितोषिक देवून सत्कार

जाई काजळ प्रायोजित दुर्ग बांधणी स्पर्धेतील क्रमांक १ चे पारितोषिक मातोश्री, प्लॉट क्रमांक १११ (धारूर किल्ला), द्वितीय क्रमांक ओम साई दर्शन, प्लॉट ८२९ (वसई किल्ला) व क्रमांक ३ चे पारितोषिक रेणुका निवास, प्लॉट १३६ (पदमदुर्ग) यांनी पटकावला.
मुंबईः दि.२१(प्रतिनिधी) प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहेब प्रतिष्ठान – गोराई Saheb Pratishthan Gorai या संस्थेच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे Thakre यांच्या स्मृतिदिनानिमित्त सलग ८ व्या वर्षी दुर्ग बांधणी स्पर्धा, खुली व्यंगचित्रकला स्पर्धा व ऑनलाईन अभिनय स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी अर्थात मंगळवार दि १७ नोव्हेम्बर २०२० रोजी संध्याकाळी ७ वा सेंट रॉक्स शाळा, गोराई २, बोरिवली पश्चिम येथे पार पडला. या कार्यक्रमास शिवसेना नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा सौ संध्या दोशी Sandhya Doshi, उपविभागप्रमुख श्रीमान पांडुरंग देसाई, महिला उपविभाग संघटक सौ अश्विनी सावंत, बोरिवली विधानसभा संघटक श्री संजय भोसले, शाखा ९ च्या महिला शाखा संघटक सौ उषा सावंत, युवाशिव व्याख्याते व दुर्ग बांधणी स्पर्धेचे परीक्षक श्री गौरव भांदिर्गे तथा गोराई नागरी पतपेढीचे संचालक श्री आनंद शिंगटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
जाई काजळ Jai Kajal प्रायोजित दुर्ग बांधणी स्पर्धेतील क्रमांक १ चे पारितोषिक मातोश्री, प्लॉट क्रमांक १११ (धारूर किल्ला Dharur), द्वितीय क्रमांक ओम साई दर्शन, प्लॉट ८२९ (वसई किल्ला Vasai) व क्रमांक ३ चे पारितोषिक रेणुका निवास, प्लॉट १३६ (पदमदुर्ग Padamdurg) यांनी पटकावला. व्यंगचित्रकला स्पर्धेतील मोठ्या गटात क्रमांक १ प्रशांत नार्वेकर, क्रमांक २ निखिल मुळ्ये, क्रमांक ३ प्रीती मोदवाल उत्तेजनार्थ विशाल बिर्जे तथा निखिल गायकवाड यांनी पटकावला. व्यंगचित्रकला स्पर्धेतील छोट्या गटात प्रथम क्रमांक अनुष्का जाधव, द्वितीय क्रमांक यश बेर्डे, तृतीय क्रमांक मनोमय नार्वेकर, उत्तेजनार्थ सानिया यादव तथा अथर्व चव्हाण यांनी पटकावला. व्यंगचित्रकला स्पर्धेच्या मोठ्या गटाचे परीक्षण ख्यातनाम व्यंगचित्रकार श्री प्रभाकर वाईरकर यांनी तर छोट्या गटाचे परीक्षण श्री मनोहर बाविस्कर यांनी केले. लॉकडाऊन काळातील छोट्यासाठी आयोजित ‘ऑनलाईन अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वराज बोभाटे, द्वितीय क्रमांक वंदन दुलम व तृतीय क्रमांक सान्वी जाधव यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
याचदिवशी रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात श्री रमेश झगडे, प्रथमेश घोलप, रोहन वळंजू, अनिरुद्ध सागवेकर, प्रणेश वालावलकर, विशाल चौगुले, दशरथ वरणकर, धर्मपाल सुर्वे, सुगंध पवार, विनय राणे, आशिष सातपुते, कमलाकर सुर्वे, कोमल प्रसाद, प्रसाद भुरके या नामवंत रांगोळीकारांनी नेत्रदीपक रांगोळ्या चितारल्या. रांगोळी प्रदर्शनसाठी प्रायोजक म्हणून जाई काजळ Jai Kajal, नगरसेविका संध्या दोशी Sandhya Joshi व शिवम परिवाराचे श्री संजय भोसले लाभले. तसेच व्ही. जी. इलेक्ट्रॉनिक्सचे गोपाळ सावंत, ओमकार सोपं डेपोचे आनंद शिंगटे, शाखा क्रमांक १६ चे शाखाप्रमुख श्री विपुल दारूवाले, शाखा क्र ९ चे शाखाप्रमुख श्री अमोल बोरकर यांनी अर्थसहाय्य केले.