घात अपघात

Suicide… धारुर शहरात दुष्काळाचा बळी ; नापिकीला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल.

55 / 100

किल्लेधारुर दि.8 सप्टेंबर- Suicide धारूर शहरात येथील तरुण मराठा नवनाथ खामकर (वय 26 वर्ष) यांने कोरडा दुष्काळ पडल्याने नापीकीला कंटाळून आज दि.8 सप्टेंबर शुक्रवार रोजी धारूर केज रोडवरील महादेवाच्या मंदिरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

धारूर Dharur शहरातील मठ गल्ली येथील तरुण शेतकरी नवनाथ मुरलीधर खामकर याने आज दि.8 सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी धारूर केज रोडवरील महादेवाच्या मंदिरात कोरडा दुष्काळ पडल्याने शेतातील नुकसानीमुळे आपलं काय होईल? संसार कसा चालेल? केलेला खर्च व बँकेचे कर्ज कसे फेडणार? या चिंतेतून गळफास घेऊन आत्महत्या suicide केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धारूर पोलीस Police स्टेशनला माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे व हेड कॉन्स्टेबल चांदणे हे घटनास्थळी जाऊन आत्महत्या केलेल्या नवनाथ याची पाहणी करून पंचनामा केला. धारूर ग्रामीण रुग्णांलयामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर कसबा विभागातील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!