बीड जिल्ह्यात सोमवारी चारशे शाळांची घंटा वाजणार; पहा आपल्या तालुक्याचे स्थिती.

बीड दि.18 जुलै – राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 15 जुलैपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु होत असून सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 400 शाळा सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी दिली. दरम्यान, शाळेचा पहिला दिवस मजेचा राहिला. सोळा महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आकाश मोकळे झाले होते. पहिला दिवस मित्रांची भेट, गप्पाटप्पा, मौजमस्तीत गेला. आता सोमवार पासून दररोज उपस्थिती लावून ते ज्ञानार्जन करणार आहेत.
(Four hundred school bells will ring in Beed district on Monday; See the status of your taluka.)
कोरोना संकटामुळे गेल्या दिड वर्षांपासुन शाळा बंद आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने (Education department) 8वी ते 12वी वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. शाळा सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून काही मार्गदर्शक सुचना (Guidelines) देण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून याबाबतीत मिळालेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे संपुर्ण तयारी करण्यात आली आहे.
(आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपला ॲड करा)
बीड जिल्ह्यात सध्या काही ठिकाणी तुरळक प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, तर काही गावांमध्ये शाळा सुरू करावी की नाही, याबाबतचा संभ्रम आहे. गावातील शाळा सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून समित्यांनी तयारी केली आहे. ग्रामपंचायतींची ना हरकत मिळताच जिल्ह्यातील 400 शाळा येत्या सोमवारपासून सुरू होऊ शकतील.
शाळा सुरू करण्याबाबत पालक आणि ग्रामस्थ सकारात्मक असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी (मा.) डॉ. विक्रम सारूक यांनी दिली.
बीड जिल्ह्यात दि.15 जुलैपासून 75 शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तर सोमवारपासून 400 शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित आहेत.
तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळां.
वडवणी 2, पाटोदा 0, अंबाजोगाई 8, गेवराई 9, आष्टी 0, माजलगाव 7, धारूर 9, केज 12, परळी 13, शिरूर 21, बीड 4.
अशा आहेत मार्गदर्शक सुचना…
-शाळा परिसरात गर्दी टाळावी,
-एका बाकावर एक विद्यार्थी,
-दोन बाकांमध्ये 6 फुटांचे अंतर बंधनकारक,
-एका वर्गात 15-20 विद्यार्थी असावेत, -साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, -शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
-शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (vacccination) झालेले असावे, अशा सूचना आहेत.