बीड जिल्ह्यात आज सव्वाचारशेपार; अंबाजोगाईत कोरोना कहर.

बीड दि.3 एप्रिल- बीड जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस उग्र होत आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2959 प्राप्त अहवाला पैकी 434 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 2525 जण निगेटिव्ह आली आहेत. आज अठ्ठाविसाव्या दिवशी बीड तालुक्यात आज तब्बल 95 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. आज अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 112 बाधित आढळली. धारुर 4 तर केजमध्ये 22 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.

(Four hundred thirty four today in Beed district; Corona havoc in Ambajogai.)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-95, अंबाजोगाई-112, आष्टी-63, धारुर-4, गेवराई-13, केज-22, माजलगाव-30, परळी-54, पाटोदा-23, शिरुर-12, वडवणी-6
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.3 शनिवारी दुपारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 383 वरुन वाढत 434 झाली आहे. बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाने जाहिर केलेल्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज नववा दिवस आहे.

दरम्यान, शुक्रवारी राज्यात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. 47 हजार पेक्षा जास्त नवे कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण राज्यात आढळून आली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यावर लॉकडाऊनचे सावट आहे. काल मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेवून पुन्हा दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!