धारुर शहरात चार गल्ल्या तर तालुक्यातील पाच गावे ठरत आहेत हॉटस्पॉट; पहा तालुक्याची आकडेवारी

किल्लेधारूर दि.12 एप्रिल – बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात आता रुग्ण संख्या आढळून येत आहे. गेल्या दहा दिवसांत धारुर तालुक्यात 155 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आली आहेत. यात शहरातील संख्या लक्षणीय आहे. सध्या तालुक्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग वाढून 5 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या शहरातील चार गल्ल्या व तालुक्यातील पाच गावे हॉटस्पॉट ठरत आहेत.

(Four lanes in Dharur city and five villages in the taluka are becoming hotspots; See taluka statistics)

यात प्रामुख्याने धारुर शहरातील कटघरपुरा, लक्ष्मी नगर, वीर पांडूरंग चौक व हनुमान चौक या गल्ल्यांचा समावेश आहे. तर तालुक्यातील मोहिखेड, कारी, कोळपिंपरी, रुईधारुर व अंबेवडगाव या गावांचा समावेश आहे. प्रशासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे स्थानिक प्रशासनाने 5 किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या भागाला कंटेनमेंट झोन घोषित करावे अशा सुचना आहेत.

धारुर तालुक्यात सध्या दि.2 एप्रिल ते 12 एप्रिल या काळात 155 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून आले आहेत. येथील कोविड केअर सेंटरमध्ये (Covid care center) सध्या 90 कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. 23 बाधित अतिदक्षता विभाग स्वा.रा.ति. अंबाजोगाई कडे स्थलांतरीत आहेत. तर 42 सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना सुट्टी देवून गृह विलगीकरण करण्यात आले आहे.

पहा शहरातील कोणत्या गल्लीत किती?
कटघरपुरा-13, लक्ष्मी नगर-7, वीर पांडूरंग चौक-7, हनुमान गल्ली-7, कोमटवार गल्ली-4, फुलेनगर-4, धनगर वाडा-3, कसबा-3, प्रतिभनगर-3, रंगार गल्ली-3, काशिनाथ चौक-2, आयोध्या नगर-2, स्वराज्य नगर-2 याशिवाय आडस रोड, शिनगारे गल्ली, संभाजी नगर, देशपांडे गल्ली, शिक्षक कॉलनी, तहसील कार्यालय, कोविड केअर सेंटर (Covid care center), उदयनगर याभागात प्रत्येकी एक ॲक्टीव रुग्ण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!