धारुर चौकात चार वाहनांचा अपघात; केजचे दोन तरुण ठार.

केज दि.8 मे – केज शहरातील धारुर (Dharur) चौकात ट्रक, ट्रॅक्टर आणि बुलेट चा अपघात झाल्याची माहिती असून सदरील अपघातात कुरेशी शहेबाज नसीर, शेख जुबेर आसेफ या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

ऊसाचे भरलेले ट्रॅक्टर, ट्रक, कार आणि बुलेट या चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. सदरील अपघात (Accident) नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे.

पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेन च्या साहाय्याने ट्रकच्या खाली अडकलेले दबलेल्याना काढण्यात येत आहे. धारुर चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे.

( Four vehicle accident at Dharur Chowk; Kaij kills two young men.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!