माझं गाव

फ्रेंच पर्यटकाला धारुर किल्ल्यासह जुन्या वाड्यांची भुरळ; शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न.

किल्ले धारूर दि.19 फेब्रुवारी – येथील ऐतिहासिक किल्ला ( Kille Dharur), धार्मिक स्थळ व जुन्या वाड्यांना भेट देण्यासाठी फ्रेंच पर्यटक व्हिन्सेंट पास्किलेनी ( Vincent Pasquilini ) यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी अशा ऐतिहासिक ठेव्याचा शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

( French tourists are fascinated by the old castles, including the Dharur fort; Efforts for sustainable tourism. )

व्हिन्सेंट पास्किलेनी शास्वत पर्यटनासाठी ( sustainable tourism ) काम करतात. विशेषतः त्यांच्यासोबत प्राचीन मंदिरे, किल्ले, जुने वाडे, मूर्ती तसेच नदीचे घाट अशा या सगळ्या वास्तू आहेत त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं जतन केल्या जावं, त्यांचा परिसर स्वच्छ असावा म्हणजे मग या ठिकाणी पर्यटन वाढू शकेल असं मत व्यक्त केलं. आज दि.१८ शुक्रवारी त्यांनी धारुर किल्ल्यासह ( Dharur Fort ) महाजनांच्या जुन्या वाड्याला भेट दिली. यावेळी औरंगाबादचे ज्येष्ठ इतिहासतज्ञ श्रीकांत उमरीकर, पत्रकार अनिल महाजन, सय्यद शाकेर, विजय शिनगारे, विश्वानंद तोष्णीवाल, दिनेश कापसे, कृष्णा महाजन उपस्थित होते.

काय आहे उद्देश आणि शाश्वत पर्यटनावर प्रतिक्रिया…
महत्त्वाचा मुद्दा आहे पर्यटना ( tourism ) सोबत पर्यटनामध्ये वेगळा असा आहे की त्या ठिकाणी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. त्या ठिकाणीच अन्न तयार होतं तिथले जे वेगळे पदार्थ आहेत त्यांचा वापर आलेल्या पर्यटकांनी केला पाहिजे. त्या-त्या गावच्या सण-समारंभ परंपरा जत्रा त्यांचा त्या त्या वेळेस त्या तिथीला त्या तारखेला पर्यटक आले पाहिजेत. काही ठिकाणी वस्त्र विणण्याची कला असते काही ठिकाणी लोक कलाकार असतात लोकसंगीत असतं काही ठिकाणी जुन्या पोथ्या आहेत या सगळ्याचा अंतर्भाव शाश्वत पर्यटनामध्ये होतो. दुर्दैवाने याचा फारसा विचार नाही झाला.

याचा प्रसार व्हावा म्हणून फ्रान्स प्रशासन प्रांत सरकार त्यांना वेगळ्या गोष्टी साठी प्रोत्साहन देतात आणि त्यांना असं निवडायला सांगतो की तुम्ही जगभरामध्ये कुठल्या देशांमध्ये जाऊन काम करा व्हिन्सेंट पास्किलेनी पास केली. यासाठी त्यांनी भारत त्याच्यातील महाराष्ट्र ( Mahatashtra ) आणि यात मराठवाडा निवडला. गेली सात वर्ष ते आपल्या प्रदेशांमध्ये फिरत आहेत. लोकांना भेटतात छोटे व्हिडिओ तयार करतात त्यांची छायाचित्र घेतात यांचे एक प्रदर्शन तिथल्या पर्यटकांच्या साठी भरवले जाते.

दरवर्षी दिवाळीच्या नंतर ते येथे येतात आणि मार्चपर्यंत राहतात. शाश्वत पर्यटनातून स्थानिक प्रमुख स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते अशी या विषयातील मांडणी आहे. 30 मार्च पर्यंत त्यात भारतामध्ये आहेत मराठवाड्यातली ( Marathwada ) एक हजार वर्षांपूर्वीची उत्तर चालुक्यकालीन जी मंदिर आहे ती अशी एकूण चौदा महत्त्वाची मंदिर आहेत आणि यापैकी बारा मंदिरांना त्याने भेटी देऊन त्यांची माहिती मिळवली आहे. त्यांचे छायाचित्र घेतलेले आहेत, त्यांची व्हिडिओ केलेले आहेत.

या ठिकाणी पर्यटक येऊ शकतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत मराठवाडा हा संपन्न प्रदेश आहे या वास्तू मराठवाड्यात आढळतात त्या प्राचीन म्हणजे अगदी उत्तर चालुक्यकालीन किंवा राष्ट्रकुटांच्या काळात अनेक किल्ले आहेत. लेण्या सगळ्यांना माहीत आहेत पण बाकीच्या गोष्टीत अजिंठा आणि वेरुळ च्या शिवाय किंवा बिबिका मकबरा आणि पाणचक्की शिवाय देवगिरीचा किल्ला याच्या शिवाय खूप काही आहे. अशी मांडणी सातत्याने व्हिन्सेंट पास्किलेनी करत आलेले आहेत.

सगळ्यांना अजिंठा-वेरूळ माहित आहे देवगिरीचा किल्ला, मकबरा पानचक्की माहित आहे पण त्याच्याशिवाय मराठवाड्यात खूप काही आहे. आता हाच धारूरचा किल्ला दुर्लक्षित राहिलेला आहे. तो अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यटनाच्या नकाशावर येऊ शकतो किंवा आजच ज्या ठिकाणी भेट दिली ते पानगावचा विठ्ठल मंदिर असो किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने संवर्धन झालेले आहे.

असंच अंबाजोगाई जवळच्या धर्मापुरी चे केदारेश्वर मंदिर असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतात. या मंदिरांवरील शिल्पांचा अभ्यास झाला पाहिजे. पानगाव ला अतिशय मोलाची अशी ‘नरसिंह मूर्ती’ मूर्ती मुख्य मंदिरात नसून बाजूच्या एका छोट्या मंदिरात आहे. ती अभ्यासकांनी जरुर पाहिली पाहिजे व्हिन्सेंट पास्किलेनी यांनी धडपड करून ती मूर्ती बघितली. तसेच बाजूच्या मंदिरातली तुळजाभवानीची मूर्ती आहे. भवानी ची मूर्ती आहे देवीची मूर्ती आहे अशा असंख्य गोष्टी आहेत.

आपल्याकडे हे लपलेला सगळा शिल्प खजिना ( Craft treasure ) आहे. त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे मराठवाडा हा मागास नसून अतिशय संपन्न असा अतिशय समृद्ध अशा वारसांनी नटलेला प्रदेश आहे. हे समोर येणे गरजेचे आहे. व्हिन्सेंट पास्किलेनी गेली सात वर्षे आपल्या प्रदेशांमध्ये सातत्याने काम करत आहेत. या ठिकाणी विविध संस्था त्यांना त्या कामासाठी मदत करतात. आपण सगळे मिळून मराठवाड्याच्या पर्यटनाच्या बाबतीत प्राचीन वारसाच्या जतना बाबतीत संवर्धनाच्या बाबतीत गड-किल्ले लिहिण्या व प्राचीन वास्तू असलेले दर्गे या सगळ्यांच्या जतनाच्या बाबतीमध्ये प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!