कापुस खरेदीसाठी शेतकऱ्यांची मर्यादा वाढवत किमान पाच दिवस खरेदी सुरु ठेवा- परमेश्वर तिडके

किल्लेधारूर दि.११(वार्ताहर) शासकीय कापुस खरेदीची शेतकऱ्यांची मर्यादा वाढवून आठवड्यातील किमान पाच दिवस शासकीय कापुस खरेदी करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष परमेश्वर तिडके यांनी तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ३५०० शेतकऱ्यांनी दि.१३ मार्च पर्यंत कापसाची नोंद केली आहे. लॉकडाऊनमुळे कापुस खरेदीला अडथळा निर्माण झाला आहे. सध्या आठवड्यातून केवळ तीन दिवस दोन जिनिंगमध्ये ५० शेतकरी प्रत्येकी प्रमाणे कापुस खरेदी सुरु आहे. आठवड्यात केवळ ३०० शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केला जात असुन याच पध्दतीने सुरु राहिल्यात पुढील तीन महिने शेतकऱ्यांचा कापसाचे माप होणार नाही. अगदी काही दिवसांवर पावसाळा येवून ठेपलेला असून शेतकऱ्यांस याकाळात कापुस भिजून मोठा आर्थिक फटका बसु शकतो. यासर्व बाबीचा विचार करुन शासनाने किमान १०० शेतकरी रोज याप्रमाणे आठवड्यातून किमान पाच दिवस कापुस खरेदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे परमेश्वर तिडके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!