पंतप्रधान मोदी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

दिल्लीः पंतप्रधान PM नरेंद्र मोदी Narendra Modi यांची मुख्यमंत्र्यांची बैठक सकाळी दहा वाजता सुरु झाली असुन दुपारी ३ वाजता महाराष्ट्रात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. कोरोनावर corona बैठकीत चर्चा होत आहे. सध्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हि.सी. द्वारे पंतप्रधान PM मोदीची चर्चा. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल व केरळचा यात समावेश आहे. उर्वरित राज्यांशी पंतप्रधान बारा वाजता संवाद साधणार आहेत. या आठ राज्यात सध्या कोरोना corona रुग्णांची संख्या वाढली आहे. या बैठकीनंतर दुपारी कोरोना विषयी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होवून लॉकडाऊन Lockdown की अनलॉक Unlock किंवा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना व निर्बंधाच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल.