वेडाच्या भरात तरुणाने केला मावशी व आजीचा खून; सेनगाव तालुक्यात आज घडलेला थरार.

हिंगोली दि.20 मार्च – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आज सकाळी दोन जणांची निर्घूण हत्या (Murder) झाल्याची घटना घडली असून या घटनेने सेनगाव तालुका हादरला आहे. एका वेडसर तरुणाने आपल्या सख्ख्या मावशी व आजीचा वेडाच्या भरात खून (Murder) केल्याची घटना 20 मार्च शनिवार रोजी सकाळी सातच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडली. विशेष म्हणजे आरोपीने मावशी व आजीचे हातपाय बांधून मारहाण केल्याचे घटनास्थळावरून दिसून येत होते.
(The young man killed his aunt and grandmother in a fit of madness; Today’s tremor in Sengaon taluka.)
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास नंदूलाल चऱ्हाटे वय (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. रोहिदास चऱ्हाटे हा मनोरूग्ण असून आजी देविकाबाई दशरथ पहारे (वय ८०) यांच्याकडे गावाजवळील एका शेतातील शेडमध्ये राहत होता. मावशी मंगलबाई उत्तम बशीरे (वय ४५ रा. परभणी) ही पुसेगाव येथे भेटीसाठी आली होती. दि.20 मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास रोहिदास चऱ्हाटे याने वेडाच्या भरात आजी व मावशीचे हात पाय बांधून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात सुरवात केली.
यात मावशी मंगलबाई उत्तम बशीरे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर आजी देविकाबाई पहारे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. जखमी आज्जीस हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दवाखान्यात नेण्यापूर्वीच तिचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाली. उपविभागीय पोलीस (Police) अधिकारी यतीश देशमुख, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गिरी, पोलीस उपनिरिक्षक अशोक कांबळे, जमादार पोटे यांनी घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले. दुपारपर्यंत घटनेचा पंचनामा सुरू होता.