होय जुनी वाहने भंगारात निघणार – नितिन गडकरी.

नवी दिल्ली दि.27 अॉगस्ट – मोदी सरकारकडून जुनी वाहने भंगारात काढण्याचे धोरण आखले असून या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जुनी वाहने भंगारात काढणे का गरजेचे आहे, हे आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ग्राफिक्स शेअर करत स्पष्ट केले आहे. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या निर्णयावर नाराजीचा सुर उमटत असल्याने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

(Yes, old vehicles will be scrapped – Nitin Gadkari.)

गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका ग्राफिक्स मधून, यामध्ये त्यांनी जुन्या वाहनांमुळे काय धोका उद्भवू शकता, याचा साद्यंत तपशील दिला आहे. एखादा जुना झालेला ट्रक हा चांगल्या स्थितीतील ट्रकइतका धूर सोडतो. जुनी झालेली टॅक्सी एकावेळी 11 टॅक्सी सोडतील एवढा धूर वातावरणात सोडते. त्यामुळे म्हणजे रिप्लेस होणे गरजेचे आहे.

पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन
त्यामुळे केवळ वाहनांच्या देखभालीवर होणारा खर्च कमी होणार नाही तर प्रदूषणही घटेल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला. वाहने भंगारात काढण्याचे धोरण जाहीर केल्यानंतर केंद्र सरकार पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. फेम-1 योजनेला मिळालेल्या यशानंतर केंद्राने 10 हजार कोटींची फेम-2 योजना अंमलात आणली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी (Electric vehicles) चार्जिंग स्टेशनसारख्या (Charging station) पायाभूत सुविधा उभारण्यावर केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे.

15 वर्षांपर्यंत वापरता येऊ शकते
केंद्राच्या स्क्रॅपेज पॉलिसीनुसार (Scrapage policy) एखादी गाडी 10 वर्षे जुनी असेल तर त्याची फिटनेस टेस्ट (Fitness test) करवून घ्यावी लागेल. या टेस्टमध्ये पास झाल्यास रजिस्ट्रेशन फी ऐवजी ग्रीन टॅक्स (Green tax) द्यावा लागेल. त्यानंतर संबंधित वाहन पुढील 15 वर्षांपर्यंत वापरता येऊ शकते. तसेच 20 वर्षे जुनी वाहने फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल. जेणेकरून ही वाहने रस्त्यावर चालवता येणार नाहीत. व्यावसायिक वाहने 15 वर्षानंतर तर खासगी वाहने 20 वर्षांच्या वापरानंतर भंगारात काढण्यात येतील. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने जुनी झाल्यानंतर भंगारात काढण्यावाचून इतर कोणताही पर्याय होणार नाही. मात्र, यामुळे नागरिकांनाच फायदा होईल, असे केंद्राचे म्हणणे आहे. जुन्या वाहनांमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि अपघात कमी होतील, असा सरकारचा दावा आहे.

फ्लेक्सिबल सिस्टमवाल्या इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. ऑटो उद्योगाची संघटना असलेल्या सियामच्या वार्षिक परिषदेत संबोधित करताना गडकरी म्हणाले की, सरकार फ्लेक्सिबल सिस्टमवाल्या (Flexible system) इंजिनांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, जे ग्राहकांना 100% पेट्रोल किंवा 100% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल, असेही गडकरी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!