Gelatin explosion बीडच्या तीन मजुरांचा स्फोटात मृत्यू ; पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे.

बीड दि.19 एप्रिल – बीडच्या तीन मजुरांचा नाशिक जिल्ह्यात एका विहिर खोदकाम करत असताना झालेल्या जिलेटीनच्या स्फोटात ( Gelatin explosion ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. मयत मजुर हे आष्टी तालुक्यातील आहेत.
(Gelatin explosion) Three laborers of Beed died in the explosion; The police turned the wheels of investigation. )
याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वाघेरा घाटावरील हिरडी या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून विहिरीचे खोदकाम सुरू होते. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता खोदकामात जिलेटीन सुरुंगाचा बार उडवला जात होता. याच स्फोटात सापडून तीन कामगारांच्या हातापायासह डोक्याला गंभीर दुखापत झाली. ग्रामस्थांनी तातडीने गंभीर जखमी अवस्थेतील कामगारांना रोहिले आरोग्य केंद्रामार्फत रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. परंतू तत्पुर्वीच या कामगारांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
विहिर खोदकाम करणाऱ्या या मयत कामगारांमध्ये लहू महाजन (39, वंजारवाडी, आष्टी, बीड), आबा उर्फ पिनू बोराडे (36, आष्टी बीड) आणि विभिषण जगताप (40, धिरडी, आष्टी, बीड) यांचा समावेश आहे. या बाबतची माहिती हरसूल पोलीस ठाण्याचे ( Police Station ) पोलीस अधिकारी दिलीप बोडके यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हिरडी येथे धाव घेतली. ही दुर्घटना कशी घडली, स्फोटात कामगार कसे सापडले याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात ( Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सदर घटनेने बीड ( Beed ) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.