बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका ठरतोय हॉटस्पॉट; नवोदय विद्यालयात 20 कोरोनाबाधित

गेवराई दि.5 मार्च- बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई तालुका नव्या कोरोना लाटेत हॉटस्पॉट ठरत आहे. गेल्याच आठवड्यात गेवराई तालुक्यातील एका आश्रमात २९ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पाठोपाठ आज शुक्रवारी तालुक्यातील गढी येथील जवाहर नवोदय विद्यालयात (Navodaya Vidyalaya) 20 कोरोनाबाधित आढळल्याची दुसरी खळबळजनक घटना समोर आली आहे.
(Gevrai taluka in Beed district is becoming a hotspot; 20 corona in Navodaya Vidyalaya)
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. जिल्ह्यात काल तब्बल 95 कोरोनाबाधित (Corona Positive) आढळल्याने जिल्हा प्रशासनाने नवीन आदेश काढत गर्दीच्या कार्यक्रमावर कडक निर्बंध लावले आहेत. यातच गेवराई (Gevrai) तालुक्यात आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येण्याची घटना घडली आहे.
गढी येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात (Navodaya Vidyalaya) एका शिक्षकाला कोरोनाबाधा (Corona Positive) झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. यात शिक्षक व विद्यार्थ्यांसह 20 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे खळबळ उडाली असून तहसीलदार सचिन खाडे यांनी पुन्हा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.