एकतर्फी प्रेमातून युवतीला व्हाॅट्सॲपवर अश्लील मॅसेज… अंबाजोगाईत एकावर विनयभंगाचा गुन्हा

अंबाजोगाई: दि.२(प्रतिनिधी)-खाजगी क्लास मध्ये नोकरी करत असलेल्या एका २१ वर्षीय युवतीला क्लास चालकाने एकतर्फी प्रेमातून लग्नासाठी नकार दिल्यानंतर ‌व्हाॅट्सॲपवर (Whatsapp) सतत अश्लील मेसेज करून त्रास देत विनयभंग केल्याची घटना अंबाजोगाई (Ambajogai) शहरात उघडकीस आली असून याप्रकरणी क्लास चालकावर शहर पोलिस (Police) ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारी नुसार, पिडितेने २०१७ साली कल्याण मोरे याच्या रसायन केमिस्ट्री नावाचा खाजगी शिकवणीत दोन महिने नोकर केली. त्या दरम्यान कल्याण मोरे याने तिला लग्नाची मागणी घातली. पिडीतेने त्याला नकार दिल्यानंतरही तो नेहमीच लग्नासाठी मागणी घालून त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने क्लासची नोकरी सोडून दिली आणि कुटुंबासह लातूरला (Latur) शिक्षणासाठी गेली. त्यानंतरही कल्याणने लातूरपर्यंत (Latur) पाठलाग करून आणि सतत मेसेज, कॉल करून पिडीतेला त्रास दिला. काही काळानंतर पीडिता पुन्हा अंबाजोगाईला परतली, तिने मोबाईल क्रमांकही बदलला. दि. ३ ऑक्टोबर रोजी कल्याणने पिडीतेचा नवीन मोबाईल क्रमांक उपलब्ध करुन गुरुवारी (दि.३१) कल्याणने तिला कॉल केला, परंतु त्याचा आवाज ऐकताच तिने कॉल बंद केला. त्यानंतर त्याने व्हाॅट्सॲपवर (Whatsapp) सतत अश्लील मेसेज पाठवले. अखेर त्रासलेल्या पिडीतेने शुक्रवारी (दि.०१) अंबाजोगाई (Ambajogai) शहर ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तिच्या तक्रारीवरून कल्याण मोरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस (Police) करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!