कोरोंना विशेष

दिलासादायक बातमी … कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती नको! पहा काय आहे कारण…

नवी दिल्ली दि.27 जून – गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा केली जात आहे. प्रशासकीय पातळीवरही संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी युध्दपातळीवर उपाययोजना आखल्या जात आहेत. हे सर्व सुरु असतानाच आयसीएमआरच्या (ICMR) अभ्यासातून तिसऱ्या लाटेची (Third wave of corona) भीती नसल्याचा दिलासादायक निष्कर्ष समोर आला आहे.

(Good news … don’t be afraid of the third wave of Corona! See what is because …)

कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण असण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ॲाफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेने एका अभ्यासातून काढला आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत असून तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असतानाच तसेच डेल्टा प्लस विषाणूचे 48 रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष हाती आले आहेत.

आयसीएमआरने लंडनच्या इम्पेरियल कॉलेजच्या सहकार्याने हा अभ्यास केला. भारतात फेब्रुवारीच्या मध्याला कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. तर पहिली लाट गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आली होती. या दोन लाटांनी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला होता. सध्या दुसरी लाट ओसरत आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे आणखी हाहाकार माजू शकतो असे चित्र काही जणांकडून उभे करण्यात येत आहे. आयसीएमआरने गणिती प्रारुपांच्या आधारे कोरोना साथीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या स्वरुपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित एक लेख इंडियन जर्नल आॅफ मेडिकल रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) कोणत्या कारणांमुळे येऊ शकते याचा विचार या अभ्यासात करण्यात आला.

कोरोनाच्या दोन लाटेचा सामना केल्यानंतर यंत्रणांना मोठ्या प्रमाणात अनुभव आलेला आहे. तर कोरोनाच्या उच्चाटनासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. यात देशभर जास्तीत जास्त लसीकरण (vacccination) करण्यावर भर देण्यात आला आहे. तर कोरोनाचा संसर्ग (Corona infection) अधिक असलेल्या भागात आजही लॉकडाऊन (lockdown) सारखा पर्याय अवंलबला जात आहे.

आयसीएमआरच्या साथ व संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी कोरोना लसीकरणाची (vacccination) मोहीम वेगाने राबविल्यास, तसेच लॉकडाऊन (lockdown) या सारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत मिळणार असल्याची प्रतिक्रिया तिसऱ्या लाटे विषयी बोलताना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!