धक्कादायक … बीड, लातूर व नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून आत्महत्येचा प्रयत्न.

बीड/लातुर दि.4 नोव्हेंबर – लातूर (Latur) जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता वेगळे वळण घेतले आहे. जिल्ह्यात बुधवारी (दि.3 नोव्हेंबर) दोन ठिकाणी आत्महत्येचा (Suicide) अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटना ताज्या असताना आज औसा येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अन्य कर्मचाऱ्यांनी त्यास झाडावरून उतरविल्याने प्रयत्न अयशस्वी झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात व नाशिकमध्ये अशाच घटना समोर आल्या आहेत.
(Shocking … Attempted suicide by ST employees in Beed, Latur and Nashik.)
औसा येथील आगारात (Depot) कर्मचारी आंदोलन करत असताना त्यांना आगारातून हुसकावून लावले होते. यानंतर चालक रमाकांत जेवळीकर यांनी कंटाळून झाडावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने दोरी घेऊन चढला होता. यावेळी आगार प्रमुख (Depo Manager) गायकवाड आणि अन्य आंदोलकांनी समजावून सांगितले. अखेरीस त्याला झाडावरून खाली घेण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले.
कर्मचार्यांच्या हातावर ऐन दिवाळीच्या सणांमध्ये तुटपुंजी रक्कम ठेवण्यात येत आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik) तीन एसटी कर्मचार्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तीन कर्मचार्यांपैकी एका कर्मचार्याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार हजार रुपये हाती आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचार्याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा एसटी कर्मचार्यांचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कडा येथे जामखेड-पुणे बसवरील चालकाने बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न (ST driver) केल्याची खळबळजनक घटना आज (दि.4) दुपारी घडली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत चालकाला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बाळू महादेव कदम (35, रा.आष्टी ) असे चालकाचे नाव असून ऐन दिवाळीच्या दिवशी कर्तव्यावर असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. आज दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले.
चालक कदम यांनी विषारी द्रव्य प्राशन (attempt to suicide) केल्याचे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे, वाहतुक नियंत्रक आलिशा बागवान, मुन्ना रावल, सुरेश खंदारे आणि वाहक यांनी त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन का केले याचे कारण अस्पष्ट आहे.