शेतकऱ्यांसाठी खुषखबर… यंदाही वाढणार सोयाबीनचे दर.

बीड दि.27 जून – अद्यापपर्यंत सोयाबीन (soybean) पिकाने जमिनीच्या कुशीतून डोकेही वर काढलेले नाही. पाऊस किती व कसा पडेल हे सांगणेही कठीण आहे. पण, सोयाबीन तेल कंपन्यांनी (soybean oil company) पाच हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन खरेदी करण्यासाठी बुकिंग (Booking) सुरू केली आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीन दरात वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. तेल कंपन्यांनी नोव्हेंबरपर्यंतच्या बुकिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

(Good news for farmers … soybean prices will go up again this year.)

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू आहेत. इतर पिके घेण्याऐवजी सोयाबीन पिके घेण्याकडे शेतकऱ्याचा (farmers) यंदा कल वाढला आहे. यावर्षी सर्वाधिक कापुस, ऊस लागवड आणि त्यापाठोपाठ सोयाबीन पिकाचा पेरा वाढला आहे. यावर्षी केंद्र शासनाने हमी भाव जाहीर केले असून, सोयाबीनला तीन हजार 880 रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे.

खरिपातील एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. पाऊस कसा पडतो त्यावर शेतीचे गणित अवलंबून असून, समाधानकारक पाऊस पडल्यास सोयाबीन (soybean) उत्पादकामध्ये वाढ होईल. गेल्यावर्षी पावसाने ओढ दिली होती. तरीदेखील एकरी 6 ते 7 क्विंटलचा सोयाबीनचा उतारा मिळाला होता.

सध्या सोयाबीन तेलाचे दर वाढले आहेत. तेलाच्या दरात किलोमागे 20 ते 30 रुपये चढ-उतार तेल कंपन्यांकडून गृहित धरले आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर वाढलेले राहतील, असा अंदाज पकडून परिसरातील सोयाबीन तेल कंपन्या (soybean oil company) खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दराने बुकिंग घेत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कंपन्यांनी सोयाबीनची बुकिंग सुरू केल्याने यंदा सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचे भाकित व्यापारी वर्तुळातून वर्तवले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादित करतात. बीड शिवाय बार्शी व लातूर आदी ठिकाणच्या बाजारपेठेत शेतकरी सोयाबीन विक्री करतात. गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील मोठ्या गावात शेतकरी कंपन्यांमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. तेल कंपन्यांकडून 5 हजार 500 रूपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन खरेदीसाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!