आनंदाची बातमी; गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना मिळणार दरमहा 3000… झाली 45 लाख नोंदणी

नवी दिल्ली दि.13 मार्च- गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना समोर ठेवून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारने अशा व्यक्तींसाठी दर महिन्याला 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. या योजनेसाठी 4 मार्च 2021 पर्यंत सुमारे 45 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारने अशा व्यक्तींसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची (PM Shram Yogi Mandhan Yojana) सुरुवात केली आहे. यामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा 3000 रुपये किमान पेन्शन दिली जाईल. सरकारने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरु केली होती.
(Good news; Poor and senior citizens will get 3000 per month … 45 lakh registrations)
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ज्यांचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे असे 18-40 वर्षांच्या समूहाचे श्रमिक सहभागी होऊ शकतात. PM-SYM योजनेअंतर्गत 55 रुपये ते 200 रुपये महिना गुंतवणूक (Investment) केली जाऊ शकते. यामध्ये 18 वर्षाच्या व्यक्तींना महिना 55 रुपये आणि 30 वर्षांच्या व्यक्तीला 100 रुपये तर 40 वर्षीय व्यक्तीला 200 रुपये महिना भरावे लागतील.
जर एखाद्या श्रमिकाने 18 व्या वर्षी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन (PM-SYM) योजनेत आपली नोंदणी केली तर त्याला एका वर्षाला केवळ 660 रुपये जमा करावे लागतील. या श्रमिकाला 60 व्या वर्षापर्यंत 27,720 रुपये गुंतवावे (Investment) लागतील. श्रमिकाला 42 वर्षांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. 60 वर्षे झाल्यानंतर त्याला दरमहा 3000 रुपये मिळतील. भारतीय जीवन विमा निगमच्या (Life Insurance Corporation LIC) माध्यमातून ही योजना चालवली जात आहे. त्यामुळे पेन्शनही एलआयसीकडून (Life Insurance Corporation LIC) दिली जाणार आहे.
नोंदणी करण्याची पध्दत
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत (PM-SYM) नाव नोंदवण्यासाठी श्रमिकांना आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटरला जाऊन खाते सुरु करावे लागेल. खाते सुरु केल्यानंतर श्रमिकांना श्रम योगी कार्ड जारी केले जाईल. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी 1800-267-6888 या हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल.