शैक्षणिक

आनंदाची बातमी … तब्बल 10466 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया;

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) भरतीची वाट पाहणाऱ्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण IBSC ने तब्बल 10466 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया (recruitment) राबवण्यासंदर्भात नोटीस जाहीर केली आहे. IBPS या भरतीअंतर्गत क्षेत्रीय ग्रामीण बँक (RRB) ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज (Clerk), ऑफिसर स्केल-I (PO), ऑफिसर स्केल II आणि , III रिक्त पदे भरली जाणार आहेत. आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in. वर जारी जाऊन उच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.

(Good news … recruitment process for 10466 vacancies;)

IBPS RRB X 2021: महत्त्वपूर्ण तारखा
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया काल 8 जून 2021 पासून सुरु झाली आहे.
त्यामुळे उमेदवार 28 जून 2021 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज (Online apply) जमा करु शकतो. तसेच 28 जूनपर्यंतच अर्जाची फी जमा करावी लागणार आहे. या ऑनलाईन (online) परीक्षांसाठी कॉल लेटर जुलै किंवा ऑगस्ट डाऊनलोड होईल. तसेच या पूर्व परीक्षांची सुरुवात ऑगस्ट 2021 पासून होणार असून सप्टेंबर 2021 रोजी निकाल जाहीर होतील. पूर्व परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल.

आयबीपीएस आरआरबी पीओ मेन्स परीक्षा सप्टेंबर 2021 रोजीच होण्याची शक्यता आहे. आयबीपीएस आरआरबी क्लर्क मेन्स ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केली जाऊ शकते.
एकूण रिक्त पदे
१) ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) – 5096 रिक्त पदे
२) ऑफिसर स्केल 1 (असिस्टेंट मॅनेजर) – 4119 रिक्त पदे
३) ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर)- 1100 रिक्त पदे
४) ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) – 151 रिक्त पदे

वयोमर्यादा
ऑफिस असिस्टेंट (मल्टीपर्पस) ,ऑफिसर स्केल 1 (असिस्टेंट मॅनेजर) ऑफिसर स्केल 2 (मॅनेजर) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 दरम्यान असणे गरजेचे आहे. तर
ऑफिसर स्केल 3 (सीनियर मॅनेजर) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 40 दरम्यान पाहिजे. 1 जून 2021 या वर्षाच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.

वेतन
ऑफिस असिस्टेंट पदासाठी 7000 ते 19300 वेतन निश्चित केले आहे, तर,ऑफिसर स्केल 1, ऑफिसर स्केल 2 पदांसाठीचे सरासरी वेतन 14000 ते 28000 रुपयांपर्यंत आहे. तसेच ऑफिसर स्केल 3 पदासाठी 25000 ते 31500 वेतन निश्चित केले आहे.

अर्जाची फी
१) सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी – 850 रुपये
२) एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी – 175 रुपये
ऑनलाईन अर्ज कसा करावा .
सर्वप्रथम IBPS ची अधिकृत वेबसाइट ibps.in वर जात होमपेजवरील CRP RRBs सेक्शनमध्ये जावे लागेल. त्यानंतर तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्जाची प्रक्रिया (Online apply) पूर्ण करा. परंतु अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली माहिती पूर्णपणे वाचू घ्या.

अशी असेल निवड प्रक्रिया
IBPS RRB पीओ किंवा क्लर्क भरती परीक्षा तीन टप्प्यांत आयोजित केली जाते. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा (IBPS Prelims exam), दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा (IBPS Mains exam) होते. मेन्स परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांच्या मुलाखतीसाठी (Interview) आणि प्रमाणपत्र पडताळणीसाठी (DV) यादी तयार केली जाते. मुलाखत आणि प्रमाणपत्र पडताळणीच्या आधारे संस्था अधिकृत वेबसाइटवर एक प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट तयार करते.
अधिकृत वेबसाईट
https://ibps.in/

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!