शैक्षणिक

खुषखबर … MHT CET 2021 साठी नोंदणी सुरु; अर्ज कसा करावा?

मुंबई दि.9 जून – कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून राज्यात सध्या अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 (MHT CET 2021) साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन (Online) पद्धतीने होईल.

(Good news … Registration for MHT CET 2021 begins; How to apply?)

अर्ज नोंदणीला 8 जूनपासून सुरुवात
अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

अर्ज कसा कसा करावा ?
MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2021.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करा
त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.

MHT CET 2021 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन (Online) पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.
तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. बारावीचा निर्णय होईपर्यंत नोंदणीला सुरुवात केली नव्हती. बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सीईटी सेलनेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!