खुषखबर … सोमवारपासून बीड जिल्ह्यातील एसटी बस धावणार;

बीड दि.4 जून – जवळजवळ दिड महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बस (ST Bus) सेवेला 7 जून सोमवारपासून सुरुवात होत असल्याची माहिती बीड (Beed) विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी दिली. बससेवा सुरु करताना सर्व कोविड नियमांचे पालन करुन प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन लांडगे यांनी केले.
(Good news … ST buses will run in Beed district from Monday;)
बीड (Beed) विभागातील बीड, अंबाजोगाई, गेवराई, धारुर, माजलगाव, परळी, आष्टी व पाटोदा या आगारातून बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत. प्रवाशांसाठी 100 टक्के क्षमतेने बस धावणार असून बसमध्ये मास्क वापरणे मात्र बंधनकारक असणार आहे. बस स्थानकावर प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटायझ करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना तशा सुचना दिल्याची माहिती माहिती एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी दिली.
एसटी महामंडळाची बस (ST Bus) सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे बीड जिल्ह्यात 14 एप्रिल पासुन एसटीला ही प्रवासी सेवा बंद करावी लागली होती. केवळ मालवाहू सेवा सुरु ठेवण्यात आली होती. आता महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाल्याने प्रवाशी सेवा सुरु होत आहे.
तब्बल दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर 7 जून सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये (lockdown) काही प्रमाणात सूट दिल्याने अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटी बससेवा (ST Bus) सुरु होण्याच्या प्रतिक्षेत होते. यामुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
धारुर आगारातून या गाड्या होणार सुरु.
धारुर आगारातून सोमवार पासून केज, अंबेजोगाई, माजलगाव या ठिकाणांसाठी प्रति तासाला तर बीड साठी प्रत्येक दोन तासाला व पुणे-मुंबई ही संध्याकाळच्या वेळी गाडी जाणार असून प्रवाशांनी या प्रवासी वाहतुकीचा लाभ सर्व नियमांचे पालन करून घ्यावा असे आवाहन धारूर आगाराचे आगारप्रमुख शंकर स्वामी यांनी केले आहे.