खुषखबर … घर बसल्या बदलता येणार स्टेट बँकेची शाखा.

नवी दिल्ली दि.10 मे – स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात ग्राहकांना आपल्या बँकेची शाखा बदलण्यासाठी वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. स्टेट बँकेने बँकेची (SBI) शाखा बदलण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन केली आहे. त्यामुळे ग्राहक आता घरबसल्या सहजपणे आपली स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा (Transfer Bank Account) बदलू शकता येणार आहे.
(Good news … State Bank branch can be changed at home.)
यासाठी संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
स्टेट बँक ऑफ इंडियाची (State Bank Of India) सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना महामारीत ग्राहकांना सुविधा देण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत तुम्ही तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर (Transfer Bank Account) करू शकता. यासाठी बँकेत जाऊन अर्ज देण्याची आवश्यकता नाही.
ब्रँच बदलण्याची ऑनलाईन प्रक्रिया
पुढील प्रक्रियेचा वापर करून करा
बँक अकाउंट ट्रान्सफर-
शाखा बदलण्यासाटी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) अधिकृत वेबसाईटवर Onlinesbi.com वर जा. तिथे तुम्ही आपला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
आता ‘पर्सनल बँकिंग‘ हा पर्याय निवडा आणि युजन नेम आणि पासवर्ड टाका.
आता इथे ई सर्व्हिस टॅबवर क्लिक करा. यानंतर ट्रान्सफर सेव्हिंग्स अकाउंटवर क्लिक करा. इथे तुम्ही आपल्या अकाउंटला सिलेक्ट करा ज्या अकाउंटला तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहे. याशिवाय तुम्हाला ज्या शाखेत आपले खाते ट्रान्सफर करायचे आहे त्या शाखेचा आयएफएससी कोड टाका.
सर्व माहिती व्यवस्थितपणे चेक करा आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. असे केल्यानंतर तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. त्याला भरून कन्फर्म करा. या प्रक्रियेद्वारे दुसऱ्या बँक शाखेपर्यत तुमची रिक्वेस्ट पोचेल. याचा स्वीकार होताच बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ब्रँच ट्रान्सफरची माहिती देण्यात येईल.
तुम्ही हवे असल्यास योनो एसबीआय (Yono SBI), योनो लाईट अॅपद्वारेसुद्धा (Yono lite app) आपल्या बँकेची शाखा बदलू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे नाही.
नेट बँकिग आणि मोबाईल अॅप बँकिंग
अलीकडच्या काळात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचबरोबर लोकांना भुरळ पाडून त्यांच्याकडून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे त्यांच्या खात्यातून पैसे गायब केले जात आहेत. अशा प्रकारच्या फ्रॉड किंवा सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राहकांना अलर्ट जाहीर करत असते.
अलीकडच्या काळात बँकिंगची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे बहुतांश सर्वच बँकांनी नेट बँकिग आणि मोबाईल अॅप बँकिंगची सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बँकेच्या शाखेत न जाता बरीचशी कामे ग्राहकांना उरकता येतात. शिवाय ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे चटकन पैसे ट्रान्सफर करता येतात.
कोरोनाच्या संकटकाळात डिजिटल व्यवहारांचे महत्त्व खूप वाढले आहेत. नागरिकांवर अनेक निर्बंध असल्यामुळे घरबसल्या ऑनलाईन स्वरुपात बँकिंगशी निगडीत अनेक कामे ग्राहकांना उरकता येत आहेत. बँकांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत.