वडवणी जवळ भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्स समोरासमोर धडक.

बीड दि.16 जून – आज सकाळी पाच वाजेदरम्यान बीड परळी महामार्गावर वडवणी नजदिक सदिच्छा हाॅटेल जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सचा (Swift car and travels) भिषण अपघात (Accident) झाला. या अपघातात देवडी ता.वडवणी येथील ग्रामसेवक (Gramsevak) राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी (Police) धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

(Gramsevak killed in horrific accident; Swift car and travels collide head on.)

अधिक वृत्त असे की, देवडी येथील ग्रामसेवक (Gramsevak) राजेंद्र श्रीरंग मुंडे (वय 38 वर्ष) हे बीड येथे स्विफ्ट गाडीने (क्र. एम. एच. 02 सि.पी.5226) कामानिमित्त भल्या पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून परळी कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स (क्र.एम. एच. 29 व्ही 7227) ची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. वडवणी पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणी साठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, कोरोना संकटातून सावरत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यातच वाहतूक व प्रवासी वाहतूकीला सूट मिळाली. यानंतर महाराष्ट्रात रस्ते अपघातात (Accident) वाढ होत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपुर्वीच जिंतूर तालुक्यात एका अपघातात चार जण दगावल्याची घटना घडली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!