सफाई कर्मचारी असलेल्या आजींची सरपंच पत्नीवर मात… विनातक्रार सेवेची मतदारांनी दिले फळ

कोल्हापूर दि.१९ – ज्या ग्रामपंचायती मध्ये गेली ४० वर्षांहून अधिक वेळ सफाई कर्मचारी म्हणून काम केले त्याच ग्रामपंचायतीत एका आजीबाईंना आता सदस्य म्हणून गावकऱ्यांनी पाठवले आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गड मुडशिंगी गावात ही लक्षवेधी घटना घडली आहे. या आजीबाईंचे नाव द्रौपदी रामचंद्र सोनूले असे आहे.

द्रौपदी सोनूले या करवीर तालुक्‍यातील गड मुडशिंगी या गावातील ग्रामपंचायत (Gram Panchayat) मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या ४० वर्षांपेक्षाही अधिक वेळ त्या या गावात सफाई कर्मचारी म्हणून सेवा करत आल्या आहेत. गावात सफाई कर्मचारी म्हणून इतकी वर्षे सेवा करत असलेल्या द्रौपदी सोनूले आता ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat) सदस्य म्हणून जाणार असल्याने त्यांना देखील प्रचंड आनंद झाला. केलेली सेवा विचारत घेऊन गावातील नेते तानाजी पाटील यांनी त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावासाठी आपले योगदान दिले आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे असे म्हणत उमेदवारी दिली आणि गावकऱ्यांनी सुद्धा त्याचे स्वागत करत द्रौपदी सोनूले यांना भरघोस मत देत निवडून दिले. विशेष म्हणजे द्रौपदी सोनूले यांनी गावातील एका मोठ्या पुढाऱ्याच्या म्हणजेच माजी सरपंचांच्या पत्नीचा पराभव केला आहे. गावकऱ्यांनी सुद्धा नेता न बघता ज्यांनी गावाची इतकी वर्षे सेवा केली त्याला ही संधी दिली आहे. त्यामुळे गड मुडशिंगी गावाची संपूर्ण कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!