गणेश विसर्जन … पोलिसांनी दिल्या या सुचना.

किल्लेधारूर दि.19 सप्टेंबर – आज अनंत चतुर्दशी असून आजच्या दिवशी दहा दिवसांच्या  गणेशाचे विसर्जन करण्यात येते. मात्र कोरोना आपत्तीमुळे (Corona outbreak) सलग दुसऱ्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणूकीवर निर्बंध (restrictions) लागू आहेत. या पार्श्वभूमीवर येथील पोलिसांच्या वतीने सुचना (guidelines) जाहिर करण्यात आल्या आहेत.

(Ganesh Visarjan … these instructions given by the police.)

श्री गणेश उत्सव 2021

Ganesh Visarjan ... these instructions given by the police.

विसर्जन निमित्ताने सूचना
1)श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला कुठल्याही परिस्थितीत परवानगी नाही.
2) कुठल्याही प्रकारची वाद्य बँड, DJ ला परवानगी नाही
3) मा.जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश नुसार जमावबंदी आदेश लागू आहे, कुठेही 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत.

4)सार्वजनिक विसर्जनाला बंदी आहे.
5) घरगुती गणपती हे घरीच विसर्जित करावे.
6)सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी नगर परिषदेचे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर वाहन हे मंडळा जवळ येणार आहे व तेथून गणेश मूर्ती जमा करून घेतली जाणार आहेत.
7)कृपया कोणीही विसरून स्थळी येऊ नये, तेथे गर्दी करू नये.

8) कोविड-19 (Covid-19) अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, सामाजिक अंतर, (social Distancing) मास्क चा वापर करावा.
सर्व गणेश भक्तांनी वरिल सूचनांचे पालन करून पोलीस प्रशासन, नगर पालिका, महसूल प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) नितिन पाटील यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!