मुलांच्या कोविड उपचारासंबंधी मार्गदर्शक सुचना; पहा काय आहे नव्या गाईडलाईन्स.

नवी दिल्ली दि.10 जून – कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुलांच्या उपचारासंबंधी मार्गदर्शक सुचना (guidelines) जारी केल्या आहेत.
(Guidelines for the treatment of corona in children; See what’s new guidelines.)
आरोग्य मंत्रालयाकडून (health ministry) मुलांमध्ये रेमडिसिविर (Remedesivir) इंजेक्शनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. गाईडलाईनमध्ये (guidelines) म्हटले आहे की, उपचारादरम्यान स्टेरॉईडच्या वापरावर लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. याचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणात अतिशय आवश्यक आहे. तसचे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडचा (Steroids) वापर अजिबात करू नये.
सिटी स्कॅनचा वापर विचारपूर्वक व्हावा
याशिवाय स्कॅनचा वापर सुद्धा योग्य पद्धतीने करण्याचा सल्ला दिला आहे. गाईडलाईनमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांनी मुलांचे सिटी स्कॅन (CT scan) करताना अतिशय संवेदनशीलता बाळगली पाहिजे. तर रेमडिसिविर (Remedesivir) इंजेक्शनबाबत म्हटले आहे की, एफिकेसी डेटाच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये याचा वापर केला नाही पाहिजे.
तज्ञांचा अंदाज
तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानूसार कोरोना विषाणू (corona virus) संसर्गाची तिसरी लाट (Third wave of corona) मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. तज्ञांनुसार देशात कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांसाठी धोकादायक बनली होती, तर दुसरी लाट तरूणांसाठी धोकादायक ठरली होती. तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) मुलांसाठी जीवघेणी ठरू शकते.
व्हॅक्सीन ट्रायलची परवानगी.
मुलांच्या लसीकरण (vacccination) बाबत सुद्धा प्रयत्न केले जात आहे. भारताची स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सीनची निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेकला मुलांमध्ये ट्रायलची परवानगी दिली आहे. भारत बायोटेककडून ही ट्रायल 525 व्हॉलिटियर्सवर केली जाईल. या ट्रायलमध्ये 2 ते 18 वर्षांच्या मुलांचा समावेश करण्यात येईल.
दरम्यान यावेळी 12 वर्षांपुढील मुलांची प्रकृती तपासण्यासाठी सहा मिनिटं वॉकची शिफारस करण्यात आली आहे. अनियंत्रित अस्थमा असणाऱ्यांसाठी या टेस्टची शिफारस करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे प्रकृती गंभीर असल्यास ऑक्सिजन थेरपी त्वरित सुरू केली जाणं आवश्यक आहे, द्रव आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाणं आवश्यक आहे आणि कॉर्टिकोस्टेरॉईड थेरपी सुरू केली जावी, असंही सांगण्यात आलं आहे.
लक्षणं नसणाऱ्या किंवा सौम्य कोरोना केसेसमध्ये उत्तेजक (Steroids) धोकादायक ठरु शकतात यामुळे त्यांना केवळ रुग्णालयात दाखल गंभीर आजारी असणाऱ्या कोरोना रुग्णांनाच डॉक्टरांच्या देखरेखीखाली देण्यात यावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘स्टेरॉईड योग्य वेळेवर, योग्य प्रमाणात आणि योग्य काळापुरती घेतली जावीत,’ असं मार्गदर्शक तत्वात सांगण्यात आलं आहे.
तज्ञांच्या मते स्टेरॉईडचा सर्रासपणे होणारा वापर देशात काळ्या बुरशीचा (Black fungus) संसर्ग निर्माण होण्याचं कारण आहे. तसंच पाच वर्षांखालील मुलांना मास्क लावू नका आणि सहा ते 11 वर्षांमधील मुलांना आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मास्क घालावेत असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावेळी डॉक्टरांना अत्यंत गरज असेल तरच कोरोना पॉझिटिव्ह लहान मुलांना सीटी स्कॅनसाठी (CT scan) सांगण्यात यावं असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.