आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण

मुंबई: दि.२२- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) , माजी मंत्री एकनाथ खडसे (Iknath Khadse) व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या पाठोपाठ आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
(Health Minister Rajesh Tope also contracted corona)
आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः ट्विटर वर दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असे राजेश टोपे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), माजी मंत्री एकनाथ खडसे (Iknath Khadse) यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर रात्री उशिरा राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच ट्विटर वर दिली. राज्यातील अनेक मंत्र्यांना आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेली रुग्णसंख्या मागच्या पाच दिवसात झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी राज्यात दिवसभरात तब्बल ५४२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या धर्तीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी सोशल माध्यमातून संवाद साधत स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करत लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले.