धारुर शहरातील हृदयद्रावक घटना; आठवडे बाजाराला आला अन जीव गमावला.

किल्ले धारूर दि.7 मार्च – शहरात आज सोमवार आठवडे बाजारासाठी आलेल्या एक अल्पभुधारक शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने (heart attack) निधन झाल्याची घटना घडली. ऐन रस्त्यावर घडलेल्या या हृदयद्रावक (Heartbreaking) प्रकारामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
( Heartbreaking events in the city of Dharur; Weeks came to the market and lost lives. )
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर (Dharur) तालुक्यातील पिंपरवाडा ग्रामपंचायत तहत मांजरकडा तांडा येथील अल्पभुधारक शेतकरी बंडू धोंडीबा जाधव (वय 57) नेहमीप्रमाणे पत्नीसह धारुर शहरात आठवडे बाजारासाठी सकाळी 10 च्या सुमारास आले. बसस्थानका समोरील राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) खाजगी वाहनातून उतरले.
यावेळी बाजाराकडे पत्नीसोबत चालत जात असताना बंडू जाधव हे अचानक रस्त्यावर कोसळले. याप्रसंगी सोबत असलेल्या पत्नीने आरडाओरड केला व एकच टाहो फोडला. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली.
बंडू जाधव यांच्या पत्नी शांताबाई या पिंपरवाडा ग्रामपंचायतच्या मांजरकडा तांडाच्या सदस्य आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं आहेत. एक मुलगा सैन्यदलाच्या सेवेत असून दोघे ऊसतोडणीसाठी स्थलांतरीत असल्याची माहिती माजी सरपंच परमेश्वर तिडके यांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे मांजरकडा तांडा व पिंपरवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.