घात अपघात

हृदयद्रावक घटना…. कार नदीत पडून नवरदेवासह नऊ वऱ्हाडीना जलसमाधी.

कोटा दि.20 फेब्रुवारी – एका छोट्या पुलावरुन कार नदीत पडल्याची दुर्घटना राजस्थान मधील कोटा येथे रात्री घडली असून यात लग्न समारंभानंतर घरी जाणारी नऊ वऱ्हाडीसह नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.

( Heartbreaking incident …. Car fell into the river and drowned nine people including Navradeva. )

राजस्थानमधील कोटा (Kota Rajasthan) येथील नयापुरा पोलीस ( Police ) ठाण्याच्या हद्दीतील चंबळमध्ये शनिवारी रात्री उशिरा हा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात ( Accident ) घडला. एका छोट्या पुलावरुन ही कार नदीत पडल्याची माहिती आहे. चौथ का बरवारा भागातून ही कार कोटा येथे आली होती, तिथून रात्रीच्या सुमारास परत जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा आणि स्थानिकांचा जमाव गोळा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

लोकसभा अध्यक्षांकडून शोक व्यक्त
दुसरीकडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ( Lok Sabha Speaker Om Birla ) यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बिर्ला म्हणाले की, या दुर्दैवी अपघातात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी काळजाला घरं पाडत आहे. त्यांच्या अकाली निधनाने मला अतीव दुःख झालं. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.

बिहारमध्येही स्कॉर्पिओ आणि बसची धडक
लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या एका बसवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 6 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर असून त्यांनी जबर मार लागला आहे. स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. बिहारमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली असून लग्नासाठी चाललेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!