धारुरचे मुख्याधिकारी नितिन बागूल यांची बदली; पुन्हा पद राहणार रिक्त…

किल्लेधारूर दि.11 सप्टेंबर – धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी (Chief officer) नितीन बागुल यांची बदली नाशिक (Nashik) जिल्ह्यात सटाणा नगरपालिकेत झाली असून धारूर नगरपालिकेचे पद मात्र रिक्त ठेवण्यात आल्याने आता याचा पदभार कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Dharur chief Nitin Bagul replaced; The post will be vacant again …)
धारूर नगर परिषदेला (Municipality) गेल्या दोन वर्षापासून मुख्याधिकारी म्हणून काम करणारे नितीन बागुल यांची बदली नाशिक जिल्ह्यात सटाणा नगरपालिकेत झाली. ते लवकरच येथील पदभार सोडणार आहेत. मात्र या पदावर त्यांची बदली करताना कुठल्याही मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने धारूर (Dharur) नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्तच राहणार असून याचा पदभार आता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पदाच्या मुख्याधिकाऱ्याची गरज
शहरात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत. गजानन शॉपिंग कॉम्प्लेक्स, बाजार तळ व कासार तलाव सुशोभिकरणाचे कोट्यवधी रुपयांची कामे सुरु आहेत. तर शहरात डेंग्यू (dengue) व कोरोना (Corona) सारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आहे. नगर परिषदेसमोर स्वच्छतेसह इतर नागरी सुविधा पुरवण्याचे आवाहन आहे. गेली अनेक वर्ष रखडलेली कुंडलिका पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासह आगामी निवडणूकीचे कामे आहेत. यामुळे येथे कायमस्वरुपी पदाचा मुख्याधिकारी असणे गरजेचे आहे.