हृदयद्रावक … बुडणाऱ्या लेकासह वाचवणाऱ्या बापाचाही मृत्यू ; केज तालुक्यातील घटना.

केज दि.23 अॉगस्ट – बुडणाऱ्या लेकासह वाचवणाऱ्या बापाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना केज (Kaij) तालुक्यातील एकुरका येथे घडली आहे. पाणी पिण्यासाठी विहिरीत उतरलेला मुलगा पाय घसरू विहिरीत पडल्यानंतर त्याला वाचविण्यासाठी बापाने उडी घेतली होती.
( Heartbreaking … the death of the saving father along with the drowning son; Incidents in Kaij Taluka.)
नटराज रामहरी धस ( वय 33 वर्ष ) , रोहन ( सोनु ) नटराज धस ( वय 13 वर्ष ) असे मयत बाप-लेकाचे नाव आहे. सोमवारी ( दि. 22 ) शाळा सुटल्यानंतर रोहन शेतात आपल्या वडिलांकडे गेला होता. माळ शेत म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजेभाऊ धस यांच्या शेतातील विहिरीत रोहन पाणी पिण्यासाठी उतरला होता. यावेळी पाय घसरून तो विहिरीत पडला (drowning) व गटांगळ्या खाऊ लागला. हे लक्षात येताच वडील नटराज यांनी विहिरीत उडी घेऊन रोहनला वाचविण्याचा प्रयत्न केला.
परंतू बापाला मुलास वाचविण्यात अपयश येवून दोघे बाप-लेक विहिरीत बुडाले. बराच वेळ होवून दोघे घरी आले नसल्यामुळे नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी विहिरीजवळ चप्पल व खाऊं, चॉकलेटचे (Chocolate) कागद पडलेले दिसल्याने दोघे विहिरीत पडले असतील असा अंदाज व्यक्त करुन विहिरीत शोध घेण्यात आला. बऱ्याच प्रयत्नानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती पोलीसांना देवून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहेत.