माझं गाव

चक्क कोविड सेंटर मधून रुग्ण प्रातःविधीसाठी बाहेर …. किल्लेधारूर मधील प्रकार.

किल्ले धारूर दि.28 एप्रिल – किल्ले धारूर येथील कोविड केअर सेंटर (Covid care center) मधून सकाळी पंधरा ते वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दररोज प्रातविधीसाठी मोकळ्या जागेमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले असून सोशल माध्यमात याची चांगलीच चर्चा होत आहे. तात्काळ याबाबीचा गांभिर्याने विचार करुन बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

(Patient out of Covid Center for defecation …. Types in Killedharur.)

सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यात दररोज 50 ते 70 रुग्ण कोरोना बाधित आढळून येत आहेत. येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वस्तीगृहात व शिक्षण विभागाच्या वस्तीगृहात 160 कोरोना बाधितांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 160 ची क्षमता असताना येथे सध्या 183 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात 100 रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सध्या शहरातील सामाजिक न्याय विभाग व शिक्षण विभागाच्या वस्तीगृहातील कोविडं केअर सेंटर (Covid care center) चर्चेत आहेत. येथील कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण दररोज सकाळी शौचासाठी कोविडं सेंटरच्या बाहेर उघड्यावर जाताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मैंदवाडी, घागरवाडा या गावाला जाणाऱ्या तसेच धारूर परिसरातील शेतीकामासाठी जाणारे शेतकऱ्यांच्या वर्दळीच्या या रस्त्यावर कोरोना बाधित रुग्णांचा खुला वावर दिसत आहे.

बहुतांश ग्रामीण भागातून शहराला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची ये-जा या रस्त्याने असते. त्यामुळे दूधवाले व शेतामध्ये काम करणाऱ्यांना कोरोना रुग्ण बिनधास्त वावरताना दिसत असल्यामुळे भीती वाटू लागली आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती टकले यांना विचारले असता कोविड सेंटरमध्ये मुबलक पाण्याची सोय असल्यामुळे रुग्ण बाहेर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले.

प्रशासन हतबल …
शासन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत असताना वाढीव खाटांची परवानगी देत आहे. मात्र अपेक्षित कर्मचारी भरती होत नसल्याचे दिसत आहे. 100 रुग्णांच्या मागे केवळ 24 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. यातच अनेक जागा रिक्त असल्याचे कळते. येथील कोविड सेंटर परिपुर्ण असताना कोरोना बाधित सर्रासपणे बिनधास्त वागुन आरोग्य प्रशासनाच्या अडचणी वाढवत आहेत. याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून दोन होमगार्ड पुरवण्यात आलेली आहेत. अपुऱ्या कर्मचारी व सुरक्षा रक्षकामुळे प्रशासन हतबल असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!