अंबाजोगाई रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱ्याला चिरडले

अंबाजोगाईः दि.३१(वार्ताहर) अंबाजोगाई साखर कारखान्याजवळ पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली असून सदरील व्यक्तीचे शरीर छिन्न विछिन्न झाल्याने अद्याप तो व्यक्ती कोण याचा शोध लागला नाही. मयत हे शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. राष्ट्रीय राज्य रस्ता ५४८ बी वर सदरील घटना घडली. वर्षाच्या शेवटच्या पहाटे घडलेली अपघाताची ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. अपघात (Accident) केलेल्या वाहनाचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.