असे आहेत आजचे कोरोना अपडेट….. पहा किती व कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.२७(वार्ताहर) येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज दोन ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. काल पाठवलेल्या ११ स्वॅब (Swab) नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आली आहेत. आज दोन्ही नमुन्यातील निगेटिव्ह आलेली आहेत. येथील कोविड केअर सेंटरमध्ये एकुण ९ रुग्ण उपचार घेत असुन यापैकी आज एकाची सुट्टी तर ८ जनांना लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला स्थलांतरीत करत येथील धारुर कोविड सेंटर बंद करण्यात येत असल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
राज्यातील आजची कोविड-१९ (Covid-19) स्थिती
राज्यात आज 6185 कोरोना Corona बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4089 कोरोना corona बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1672627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 87969 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.48% झाले आहे. गेल्या आठवड्यापासून राज्याची रुग्ण संख्या सतत वाढत असल्याचे दिसत आहे.